साकोली शहरातील या पाचही चौकात निर्माण होत आहे भयंकर अपघाताचा धोका

by darpanjaynagar
Spread the love

साकोली शहरातील या पाचही चौकात निर्माण होत आहे भयंकर अपघाताचा धोक

CRIME 24 TASS [] आशिष चेडगे
साकोली : एकीकडे राष्ट्रीय महामार्गावर नवनिर्माणधीन उड्डाणपुलास जलदगतिने काम सुरू आहे यातच महामार्गावरील मुख्य व मध्यमार्गावरील जड वाहतूक आता फक्त दोनच सर्व्हिस रोडवरच आल्याने दररोज पाचही चौकात भयंकर अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे. याची त्वरीत दखल प्रशासनाने घ्यावी अन्यथा येथे एकेदिवशी भयानक जीवघेणा प्रकार घडण्याचे चिन्हे दिसत आहेत.
साकोली शहरातील उड्डाणपुलचे कॉलम उभे झालेले असून आता त्यावर वरील बीसी बेडला आडवे सपोर्ट देणारे मुख्य कॉलम लोडर हाईड्रा मशीनरीने चढविण्याचे काम जलदगतिने सुरू आहे, याकरीता मुख्य महामार्ग कायम बंद ठेवलेला असून पूर्ण क्रं ०६ या महामार्गावरील वाहतुक दोन्ही सर्व्हिस रोडवरच आली आहे याने एकोडी – तुमसर रोड, कटकवार चौक, नागझिरा रोड, बसस्थानक, प्रगती कॉलनी व सेंदूरवाफा चौकात वारंवार नेहमीच वाहतूक विस्कळीत होऊन अपघातमय स्थितीत जीवीतहानीचा धोका निर्माण झालेला आहे. नगरपरीषद व स्थानिक वाहतूक प्रशासनाने आता वेळीच दखल घेणे अतिगरजेचे आहे कारण शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शालेय वेळेवर महामार्गावर रेलचेल असून हा होणारा महाभयानक धोका टाळावा असे येथील दक्ष व जागरूक नागरीकांनी क्राईम २४ तास मिडीयला सांगितले.

darpanjaynagar
Author: darpanjaynagar

Media

Related Posts

Leave a Comment