चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

by darpanjaynagar
Spread the love

चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचा

भंडारा

भंडारा : घराशेजारी राहणाऱ्या एका नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर पाशवी अत्याचार केला. ही घटना तुमसर तालुक्यातील मांढळ येथे घडली याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी नराधम युवकाला अटक केली.
लक्ष्मीकांत उर्फ छोटू सिताराम सेलोकर (३०) रा. मांढळ असे मोहाडी पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. ही घटना गुरुवारला दुपारी घडली. मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. गुरुवारी गावातील एका कुटुंबाकडे हवन कार्य होते. दरम्यान मुलीचे वडील शेतावर गेले होते तर, आई घरी होती.
मांढळ गावातील पीडित मुलगी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहतात. घटनेच्या दिवशी पीडीत मुलगी घराशेजारी सुरु असलेल्या हवन कार्यक्रमासाठी गेली होती. त्यानंतर प्रसादासाठी भावाला घेवून जाण्यासाठी घरी आली. मात्र, भाऊ झोपलेला असल्याने आईने तिला एकटीलाच प्रसाद घेण्यासाठी पाठविले. मुलगी पुन्हा प्रसाद घेण्याकरिता शेजारच्या घरी गेली. बराच वेळ ती परत न आल्याने आईने शोध सुरू केला. काही वेळानंतर मुलगी शेजारच्या युवकासोबत घराकडे येताना दिसली. ती रडत असल्याने आईने तिला विचारणा केली असता तिने आरोपीने जवळच बांधकाम सुरु असलेल्या एका घरी नेवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे तिने सांगितले.
चिमुकलीने कथन केलेल्या कृत्याने आईला धक्का बसला. याप्रकरणी मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीत सदर गाव येत असल्याने आईने रात्री मोहाडी ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून
आरोपीविरुद्ध ३७६, ए,बी, भादंवि, सहकलम ४,६,८, बाल लैंगिक (पॉक्सो) अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे हे स्वतः करीत आहेत.

darpanjaynagar
Author: darpanjaynagar

Media

Related Posts

Leave a Comment