गोंदिया जिल्ह्यातील युवतीवर चालत्या बसमध्ये बलात्कार ; आरोपीस त्वरीत शोधून फांशीची शिक्षा दया — मनसे अध्यक्ष राज साखरे
[] साकोलीत मनसे अध्यक्ष राज साखरे यांचा संताप [] मिडीयावर केली मागणी []
CRIME 24 TASS [] आशिष चेडगे
साकोली : गोंदिया जिल्ह्यातील एका गावातील युवती आपल्या चुलत बहिणीचे लग्नाकरीता स्वगावी आली व परत पुणे येथे इंजिनिअरींग कंपनीत रूजू होण्यास दि.७ जाने. नागपूरहून पुणेकरीता जायला ट्रैव्ह्ल्सने जात असता आरोपीने सीटआसन बदलवीत रात्रीबेरात्री चालत्या बसमध्ये चाकुच्या धाकावर दोनदा युवतीवर दुष्ककर्म करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून त्या नराधम आरोपी ला फक्त फांशीची शिक्षा दयावी असे या संतप्त प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना साकोली तालुका अध्यक्ष राज साखरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आरोपीचे नाव समिर देवकर वय २८ रा. सिताबर्डी नागपूर असून या धक्कादायक घटनेत समिरने युवतीला तीचे आसन मागे आहे असे सांगितले व ७ जाने. मध्यरात्री कारंजा/लाड – मेहकर मालेगांव बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरच्या जवळ ट्रैव्ह्ल्स क्लिनर समिरने त्या युवतीजवळ जात चाकूच्या धाकावर धमकावून दोनदा अतिप्रसंग केला व बसमधून बाहेर फेकण्याची धमकी दिली. पूणे पोचल्यावर पिडीता युवतीने पोलीसांत तक्रार दाखल केली असून आरोपी फरार झाला आहे व बस पोलीसांनी ताब्यात घेतली. या संतापजनक घटनेची तात्काळ चौकशी करून आरोपीला फक्त फांशीची शिक्षाच द्या अशी तीव्र मागणी मनसे अध्यक्ष राज साखरे यांनी साकोली मिडीयावर केलेली आहे.